BNR-HDR-TOP-Mobile

Pune : रोव्हर्स अकादमी, प्रभाकर अस्पात अकादमी उपांत्य फेरीत

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – प्रभाकर अस्पात अकादमी आणि रोव्हर्स अकादमी संघांनी सफाईदार विजयासह येथे सुरू असलेल्या मार ओस्थानिथोओस निमंत्रित हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. रोव्हर्सला विजयासाठी झगडावे लागले, तर अस्पातने एकतर्फी वर्चस्व राखले.

मेजर ध्यानचंद मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत रोव्हर्सला सामन्याच्या नवव्याच मिनिटाला गोल स्विकारावा लागला. पुणे सिटी लाईन बॉईज संघाच्या अमोल भोसलेने हा गोल केला. अर्थात, रोव्हर्सने तीनच मिनिटांनी गोलची परतफेड करून बरोबरी साधली. प्रणव माने याने हा गोल केला. मध्यंतराच्या 1-1 अशा बरोबरीनंतर उत्तरार्धात रोव्हर्सच्या सुफान शेख याने 43व्या मिनिटाला कॉर्नरवर गोल करून आघाडी मिळविली. यानंतर बचावावर अधिक भर देत त्यांनी ही आघाडी टिकवून विजयावर शिक्कामोर्तब केले.

  • त्यापूर्वी प्रभाकर अस्पात अकादमी संघाला देखील पहिल्या 12 मिनिटात दोन गोलने पिछाडीवर रहावे लागले होते. सामन्याच्या सहाव्या मिनिटाला आकाश सपकाळ, तर 12व्या मिनिटाला आनंद गायकवाड याने गोल केला. त्यानंतर पुढच्याच मिनिटाला मोहमंद सादिकने अस्पात अकादमीचे खाते उघडले. त्यानंतर 22व्या मिनिटाला त्यानेच संघाला बरोबरी साधून दिली. मध्यंतराला त्यामुळे सामना 2-2 असा बरोबरी दाखवत होता.

लय गवसल्यावर मात्र अस्पातच्या खेळाडूंना रोखण्यात सुपर इलेव्हनच्या खेळाडूंना जमलेच नाही. अस्पातच्या खेळाडूंनी एकामागोमाग एक गोल करत आपली गाडी सुसाट सोडली.

साम्नयाच्या 32व्या मिनिटाला गणेश गिरीगोसावीने, नंतर अरविंदा यादव याने 36 आणि 40व्या मिनिटाला, तर कुणाल जगदाळेने 51व्या मिनिटाला, अक्षय राजपूतने 54, संतोष स्वामी 58, दिलीप पालने 59व्या मिनिटाला गोल करून आपल्या धारदार आक्रमणाने सुपर इलेव्हनचा बचाव खिळखिळा केला. सुपर इलेव्हन संघाला आपल्या बचावातील त्रुटी सुधारता आल्या नाहीत. सामन्याच्या 44व्या मिनिटाला त्यांच्या रमाकांत बारामतकर याने गोल करून एका गोलने पिछाडी भरून काढली.

  • उद्या स्पर्धेचा विश्रांतीचा दिवस असून, शुक्रवारी विक्रम पिल्ले अकादमी अ विरुद्ध प्रभाकर अस्पात अकादमी (दु. 2वा.) आणि एक्‍सलन्सी अकादमी वि. रोव्हर्स अकादमी (द. 3.30 वा) असे उपांत्य फेरीचे सामने होतील.

    निकाल :
    प्रबाकर अस्पात अकादमी 10 (मोहंमद सादिक 13, 22, 53वे, गणेश गिरीगोसावी 32वे, अरविंद यादव 36, 40वे, कुणाल जगदाळे 51वे, अक्षय राजपूत 54वे, संतोष स्वामी 58वे, दिलीप पाल 59वे मिनिट) वि.वि. सुपर इलेव्हन 3 (अकाश सपकाळ 6, आनंद गायकवाज 12वे, रमाकांत बारामतकर 44वे मिनिट) मध्यंतर 2-2

रोव्हर्स अकादमी 2 (प्रणव माने 12वे, सुफिआन शेख 43वे) वि.वि. पूना सिटी लाईन बॉईज 1 (अमोल भोसले 9वे मिनिट) मध्यंतर 1-1.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.