Pune: नवीन उड्डाणपूल उभारण्यासाठी लागणार 700 कोटी

Pune: Rs 700 crore required to build new flyover 2004 ते 2006 या कालावधीत अजित पवार पालकमंत्री असताना 45 कोटी रुपयांत हा उड्डाणपूल उभारण्यात आला होता.

एमपीसी न्यूज- शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रोच्या कामात अडचणीचा ठरलेला पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल ‘पीएमआरडीए’ने मंगळवारपासून (दि.14) पाडायला सुरुवात केली आहे.

मेट्रोच्या कामासाठी दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 700 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 2004 ते 2006 या कालावधीत अजित पवार पालकमंत्री असताना 45 कोटी रुपयांत हा उड्डाणपूल उभारण्यात आला होता. त्यावेळी हा उड्डाणपूल चुकल्याची टीका करण्यात आली होती.

पुणे महापालिका नवीन उड्डाणपूल उभारताना काहीही खर्च देणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. रात्रंदिवस हा पूल पाडण्याचे काम करण्यात येणार आहे.

लवकरच पीएमआरडीतर्फे हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या कामालाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे अडचणीचे ठरलेले उड्डाणपूल पाडायला सुरुवात करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसे आदेश दिले आहेत.

महापालिका आणि राज्य सरकारच्या परवानगीनंतर मंगळवारपासून हे पूल पाडण्यास सुरुवात झाली आहे. एकाचवेळी हे पूल पाडता येणार नसल्याने तीन टप्प्यात ते पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रथम चतुःशृंगी येथील पूल त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात बाणेरकडे जाणारा व तिसऱ्या टप्प्यात औंधकडे जाणारा पूल पाडण्यात येणार आहे, असे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.