Pune : सायबर गुन्ह्यांत फसवणूक झालेल्या अर्जदारांना सायबर सेलकडून 82 हजार रुपये परत  

एमपीसी न्यूज – विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांत फसवणूक झालेल्या अर्जदारांना पुण्याच्या सायबर क्राईम पोलीस ठाण्याकडून त्यांची 82 हजार 539 रुपये परत करण्यात आले.

संजय हराळे यांच्या क्रेडीड कार्डवरून अनधिकृत व्यवहाराद्वारे त्यांची 23 हजार 279 रुपयाची आर्थिक फसवणूक केली होती. तर कल्पेश देवकाते यांना ऑनलाइन अफ्रिकन पक्षी खरेदी करीत असताना अज्ञात इसमाकडून त्यांची 22 हजार रुपयांना फसवणूक झाली होती. तर शिरीन खान यांच्या डेबीट कार्ड त्यांचेजवळ असताना त्याच्या डेबीट कार्डवर अनधिकृत ट्रॅन्झॅक्शन होऊन त्याची 30 हजार 260 रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. तर जीवनसाथी आणि स्वयंवर मॅरेज ब्यूरोकडून रोहित श्रॉफ आणि शेख रशीद या दोघांची तीन हजार आणि चार हजार रुपयांची फसवणूक झाली होती.

या सर्व तक्रारदारांना 28 एप्रिल ते 4 मे या कालावधीत एकूण 82 हजार 539 रुपये परत मिळवून दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.