Pune: आरटीई प्रवेश प्रक्रिया 24 जूनपासून

Pune: RTE admission process from June 24 Pune, RTE admission process, from June 24, education, education news in marathi, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. ती तातडीने राबविण्याची मागणी पालकांतर्फे करण्यात येत होती.

एमपीसी न्यूज- पुणेकरांचे लक्ष लागलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रिया दिनांक 24 जून पासून सुरू होणार आहे. यावर्षी शाळास्तरावरच प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत.

गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. ती तातडीने राबविण्याची मागणी पालकांतर्फे करण्यात येत होती. कोरोनाच्या संकट काळामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया सुद्धा लांबणीवर पडली होती.

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ची सुरुवात १५ जूनपासून करण्यात आली आहे. यंदा प्रवेशासाठी १ लाख १५ हजार ४४६ रिक्त जागा आहेत. तर २ लाख ९१ हजार ३७० अर्ज आले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

प्रवेशासाठी १ लाख ९२७ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. प्रवेश प्रक्रियेचे नियंत्रण शिक्षणाधिकाऱ्यांकडे राहणार आहे. आरटीई संकेतस्थळावर शाळेच्या लॉगिनमध्ये विद्यार्थ्यांची नावे, मोबाइल क्रमांक उपलब्ध आहे.

पालकांकडून मूळ कागदपत्रे आणि छायांकित प्रत घेऊन प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. कागदपत्रे योग्य असल्यास विद्यार्थ्यांच्या नावापुढे ऑनलाइन नोंद करून तात्पुरता प्रवेश देऊन पालकांकडून हमीपत्र घेण्यात येणार आहे.

दरम्यान, जीवघेण्या महागाईच्या काळात आरटीई प्रवेश प्रक्रिया गोरगरीब नागरिकांसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.