Pune : माहिती अधिकार संरक्षणासाठी राज्यभर आंदोलन करण्याचा निर्धार

एमपीसी न्यूज- माहिती अधिकार कायद्याच्या रक्षणासाठी पुण्यात माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 30) आंदोलन केले. ‘माहिती अधिकार वाचवा, लोकशाही वाचावा’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. हे आंदोलन राज्यभर करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

या आंदोलनामध्ये सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार, सामाजिक कार्यकर्ते विश्वम्भर चौधरी, प्रा. सुभाष वारे, ऍड असीम सरोदे, विनिता देशमुख, मारुती भापकर, मानव कांबळे यांच्या सहित युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माहिती अधिकाराचे रक्षण करण्यासाठी लवकरच न्यायमूर्ती संतोष हेगडे, प्रशांत भूषण या कायदेतज्ज्ञांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये रविवारी (दि. ४) बैठक आयोजित करण्यात अली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.