Pune : पुण्यातील वर्दळीच्या ठिकाणी बॉम्ब असल्याची अफवा; पुणे पोलिसांची धावपळ

एमपीसी न्यूज – पुण्यातील अत्यंत दाट वर्दळीच्या ठिकाणी वसंत टॉकीजमध्ये बॉम्ब ठेवला असल्याची अफवा पसरली. पुणे पोलिसांपर्यंत माहिती पोहोचली असता पोलिसांनी एकच धावपळ केली. पोलिसांचा भलामोठा फौजफाटा तात्काळ वसंत टॉकीजमध्ये पोहचला. सर्वत्र शोध घतला असता बॉम्ब अगर बॉम्ब सदृश्य वस्तू कोठेही आढळून आली नाही. ज्या बॅगेत बॉम्ब असल्याचे सांगितले जात होते त्यात चक्क कपडे निघाले. यानंतर नागरिकांसह पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. ही घटना सोमवारी (दि. 11) रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली.

रात्री पावणेनऊच्या सुमारास पुणे नियंत्रण कक्षाला एक फोन आला. फोनवर वंसत टॉकीज येथे बॅगेत बॉम्ब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नियंत्रण कक्षाने ही माहिती तात्काळ विश्रामबाग पोलिसांना दिली. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लगोलग घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान टॉकीज परिसरात बघ्यांची गर्दी वाढली होती. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी गर्दी केलेल्या नागरिकांना दूर केले. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. पथक देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने वसंत टॉकीज परिसरात असलेली बेवारस बॅग तपासली. बॅग उघडून पाहिले असता त्यामध्ये कपडे सापडले. बॅगमध्ये कपडे दिसताच नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

दरम्यान, वसंत टॉकीज परिसरात बॉम्ब असल्याची अफवा काही कालावधीत जवळपास संपूर्ण शहरात वा-यासारखी पसरली. या अफवेमुळे पुणे पोलीस मात्र चांगलेच कामाला लागले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.