Pune News: पुण्यातील रुपी बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँकेकडून रद्द

एमपीसी न्यूज: रुपी सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) रद्द केला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईच्या शक्यता नाहीत, बँक सुरू ठेवणे तिच्या ठेवीदारांच्या हितासाठी प्रतिकूल आहे, अशी विविध आर्थिक कारणे आरबीआयने परवाना रद्द करताना दिलेली आहेत.(Pune news) दरम्यान, ही बँक अन्य बँकेत विलीन करण्यासाठी आतापर्यंत बरेचसे प्रयत्न करण्यात आले. मात्र, बँकेच्या प्रशासकांना यश मिळाले नाही. बँकेची स्थिती 21 सप्टेंबर 2022 पर्यंत ‘जैसे थे’ राहणार आहे. या काळात ठेवीदार आणि सेवकांना विश्वासात घेऊन आणि वैधानिक सल्ला घेऊन पुढील दिशा ठरविली जाईल, असे बँकेच्या प्रशासकांकडून सांगण्यात आले.

रुपी बँक अडचणीत आल्यानंतर बँकेवर आरबीआयकडून आर्थिक निर्बंध लादण्यात आले. हे निर्बंध सातत्याने वाढविण्यात येत होते. तीन महिन्यांपूर्वीच आरबीआयने बँकेला 29 वी मुदतवाढ दिली होती. बँक गेली सहा वर्षे सातत्याने परिचलनात्मक नफा मिळवीत आहे. बँकेने गेल्या आर्थिक वर्षातही दहा कोटींची वसुली करून 2.19 कोटींचा परिचलनात्मक नफा मिळविला आहे.

Rakshabandhan : सफाई कर्मचाऱ्यांना राखी बांधून मिठाई गिफ्ट, रोटरी वाल्हेकरवाडीचा उपक्रम

सुधारित ठेव विमा संरक्षण कायदा 2021 च्या तरतुदींनुसार ठेव विमा महामंडळाने 700.40 कोटींच्या ठेवी ठेवीदारांना परत केल्या आहेत. त्यामुळे पाच लाखांपर्यंतच्या ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे.(Pune News) महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मेहसाणा को. ऑप. बँक आणि सारस्वत बँकेने रुपी बँक विलीनीकरणाचे प्रस्ताव आरबीआयकडे सादर केले होते. मात्र, आरबीआयकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळू शकला नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.