Pune Rural Crime News : कुख्यात गुंड निलेश घायवळला अटक; येरवडा कारागृहात स्थानबद्ध

एमपीसीन्यूज  : पुणे ग्रामीण पोलिसांनी कुख्यात गुंड निलेश बन्सीलाल घायवळ (वय 44) याच्या मुसक्या आवळल्या. भिगवण पोलिसांनी त्याला अटक करतानाच एक वर्ष स्थानबद्धतेची कारवाई केली. ग्रामीण पोलिसांच्या केलेल्या या धडक कारवाईने जिल्ह्यात अन पुण्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान,  त्याला  येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे.

निलेश घायवळ हा पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे  12 गुन्हे दाखल आहेत. कोथरुड पोलिसांनी 2017 साली त्याच्यावर मोक्कानुसार कारवाई केली. यात तो कारागृहात होता. पण 2020 मध्ये तो सुटून बाहेर आला.

_MPC_DIR_MPU_II

त्यानंतर कोथरुड पोलिसांनी त्याच्यावर दोन वर्षे हद्दपारीची कारवाई केली. यानंतर तो शहरातून बाहेर गेला.

ग्रामीण पोलिसांनी 74 गुन्हेगारांना केले हद्दपार

शहरात दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळण्यास सुरवात केली आहे. ग्रामीण पोलिसांनी ऑक्टोबर 2020 ते आतापर्यंत 17 टोळ्यांमधील 74 गुन्हेगाराना हद्दपार केले आहे. तर चार टोळ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.