Saswad Crime News: ‘त्या’ अर्भकाला जिवंत गाडणाऱ्या दोघांचा शोध लागला, प्रेमसंबंधातून झाला होता जन्म

एमपीसीन्यूज : पुरंदर तालुक्यातील आंबोली गावात तीन दिवसांपूर्वी दोन दिवसाच्या अर्भकाला जिवंत गाडण्याचा प्रयत्न उघडकीस आला होता. काही शेतकऱ्यांचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर अर्धवट काढलेल्या त्या अर्भकाला जीवदान मिळाले होते. परंतु, आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. सासवड पोलिसांनी कसोशीने शोध घेत नंतर त्यातील दोन आरोपींना अटक केली.

अरबाज इक्बाल बागवान (वय 23) आणि अनिकेत संपत इंगोले (वय 23) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. प्रेमसंबंधातून हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपी अरबाज बागवान याचे एका 20 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध होते. यातून त्या मुलाचा जन्म झाला होता. नवरा-बायको असल्याचे भासवून त्यांनी एका रुग्णालयात डिलिव्हरी केली होती.

त्यानंतर अरबाज याने हे बाळ मी सांभाळतो असे सांगून बाळाचा ताबा स्वतःकडे घेतला होता. त्यानंतर आरोपी अनिकेत इंगोले यांच्या मदतीने या बाळाला जिवंत गाण्याचा प्रयत्न केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.