BNR-HDR-TOP-Mobile

pune- रास्ता रोको व बंद करणा-यांवर आता होणार गु्न्हे दाखल ; पुणे ग्रामीण पोलिस दलाचे नवे धोरण

एमपीसी न्यूज – पुणे ग्रामीण जिल्ह्यात रास्ता रोको व बंद करणा-यांवर आता 1 ऑक्टोबर पासून गु्न्हे दाखल करण्यात येणार असून या गुन्ह्यांमध्ये 6 महिने ते 5 वर्षांपर्यंतचा कारावास व दंडाची शिक्षा देण्यात येणार असल्याचे नवे धोरण पुणे ग्रामीण पोलिस दलाने जाहीर केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर व पुणे ग्रामीण परिसरामध्ये कोणत्याही छोट्या मोठ्या समस्येंसाठी विविध सामाजिक संघटना महामार्गांवर रास्ता रोको व बंद तसेच धरणे आंदोलने करताना दिसत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीसारखे प्रश्न निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होतो तसेचपोलिस दलात अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे पोलिस दलाला रास्ता रोको, धरणे आंदोलने यांसारख्या घटनांमुळे त्यांच्या गुन्हे तपास व गुन्हे प्रतिबंध या मुख्य कामांवर परिणाम होतो.

त्यामुळे आता यापुढे राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर बेकायदेशीरपणे रास्ता रोको, धरणे आंदोलने करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच या गुन्ह्यांमध्ये 6 महिने ते 5 वर्षांपर्यंतचा कारावास व दंडाची शिक्षा देण्यात येणार आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3