Pune Rural Police News: दुप्पट पैसे देण्याचे अमिष दाखवून बनावट नोटा देत फसवणूक करणाऱ्या चार अट्टल गुन्हेगारांना अटक

आरोपी बाबासाहेब दाते हा फिर्यादी पवार यांना मागील 15 दिवसांपासून वारंवार फोन करून नोटा दिल्यास त्या लगेच डबल करून देतो, असे अमिष दाखवत होता.

एमपीसी न्यूज – ‘तुम्ही जेवढे पैसे द्याल, त्याच्या दुप्पट पैसे देतो’ असे अमिष दाखवून बनावट नोटा देऊन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या चार अट्टल गुन्हेगारांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी अटक केली आहे.

प्रमोद भगवान साळवे, बाबासाहेब बापू दाते (दोघे रा. कासारी, ता. पारनेर, जि. अहमदनगर), समीर दशरथ वाघ (रा. गुर्वेवाडी, ता. पारनेर, जि. अहमदनगर), अमोल बन्सी भोसले (रा. भोसलेवाडी-टेमदरा, ता. जुन्नर, जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

बाळू कारभारी पवार यांनी नारायणराव पोलीस ठाण्यात बनावट नोटा देऊन फसवणूक केल्याची मंगळवारी (दि.1) फिर्याद दिली होती.

आरोपी बाबासाहेब दाते हा फिर्यादी पवार यांना मागील 15 दिवसांपासून वारंवार फोन करून नोटा दिल्यास त्या लगेच डबल करून देतो, असे अमिष दाखवत होता. पवार यांनी नकार देऊनही आरोपी वारंवार फोन करत होता.

मंगळवारी आरोपीने पवार यांना नारायणराव येथील 14 नंबर चौकात वडा पाव सेंटरजवळ बोलावून घेतले. चौघे आरोपी पल्सर दुचाकीवरून (एमएच 14 जीक्यू 5841) आले. त्यांनी पवार यांच्याकडून 25 हजार रुपये घेतले. त्यानंतर 50 हजारांचा बंडलवर पुढे आणि मागे दोन खऱ्या नोटा लावून बाकी खोट्या नोटा देऊन 49 हजारांची फसवणूक केली.

याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर एलसीबीच्या पोलिसांनी समांतर तपास करून शिताफीने चारही आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून पल्सर दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

अटक केलेल्या आरोपींविरूध्द नारायणगाव, जुन्नर, खेड पोलीस ठाण्यात खून, दरोडा, चोरी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी अमोल बन्सी भोसले याच्या विरोधात आळेफाटा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल असून गुन्हा केल्यापासून तो फरार होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.