Pune Rural Police Recruitment : लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची कट ऑफ यादी जाहीर

एमपीसी न्यूज – पुणे ग्रामीण पोलीस भरतीसाठी हजारो उमेदवार (Pune Rural Police Recruitment) मैदानात उतरले आहेत. मैदानी चाचणी झाल्यानंतर आता लेखीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांकडून लेखी परीक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची कट ऑफ यादी जाहीर करण्यात आली आहे.

 

 

Maval News : गाडीला कट मारल्यावरून दोन गटात हाणामारी

 

सन 2021 मध्ये पुणे ग्रामीण पोलीस दलात रिक्त असलेल्या 579 पदांसाठी भरती घेण्यात येत आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलात पोलीस शिपाई पदांसाठी 18 जानेवारी ते 17 मार्च या कालावधीत पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण येथील कवायत मैदान येथे मैदानी चाचणी घेण्यात आली. या मैदानी चाचणीच्या गुणांची यादी 19 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 

 

 

 

मैदानी चाचणी झाल्यानंतर उमेदवारांनी लेखीची तयारी सुरु केली आहे. लेखी परीक्षेची तारीख (Pune Rural Police Recruitment) लवकरच जाहीर केली जाणार आहे. दरम्यान मैदानी चाचणी मधून एकास दहा या प्रमाणे उमेदवारांची लेखीसाठी निवड करण्यात आली आहे. त्याबाबत कट ऑफ यादी पुणे ग्रामीण पोलिसांकडून जाहीर करण्यात आली आहे. मैदानी चाचणीमधून सहा हजार 715 उमेदवार लेखीसाठी पात्र झाले आहेत.

 

प्रवर्गनिहाय पात्र झालेले उमेदवार
एसबीसी – 165
एनटी डी – 105
एनटी सी – 226
एनटी बी – 154
व्हीजे ए / डीटी ए – 66
एसटी – 675
एससी – 1041
अनाथ – 32

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.