Pune : एस. बी. पाटील पब्लिक स्कूल संघाला सुवर्ण पदक; मुला-मुलींचा गट राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र

एमपीसी न्यूज – पुणे विभागीय (Pune) ऐक्रोबैटिक्स आणि जिम्नॅस्टिक स्पर्धेत रावेत येथील एस.बी.पाटील पब्लिक स्कूलच्या मुलींच्या व मुलांच्या संघाने चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले. या दोन्ही संघांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धा कर्वेनगर, येथे पार पडल्या.

मुलींच्या संघात (त्रिदल) स्वामिनी घुले, ऐश्वर्या गवळी, हर्षाली चिंचवडे तर मुलांच्या गटात अथर्व आवटे, अमित कोडगानुरा यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांची राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांना क्रीडा शिक्षक धनाजी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Bhosari : वेश्या व्यवसाय प्रकरणी तिघांवर गुन्हा; दोन महिलांची सुटका

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार (Pune) शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी यांनी विजयी संघास पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.