BNR-HDR-TOP-Mobile

Pune : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये बी.सी.ए व बी.सी.एस कम्प्यूटर लॅबचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – कौशल्यपूर्ण शिक्षणाची गरज लक्षात घेऊन रयत शिक्षण संस्था सतत शिक्षण आणि रोजगाराभिमुखता याकडे लक्ष देत आहे. एस. एम. जोशी कॉलेजातील विद्यार्थी पदवी बरोबर कौशल्य घेऊन जातील ते जीवनात यशवंत ठरतील. विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी अद्ययावत कॉम्प्युटर लॅब उपयुक्त ठरेल, असे मत रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनिल पाटील यांनी व्यक्त केले.

ते बी.सी.ए (सायन्स) व बी.सी.एस कम्प्युटर लॅबच्या उद्घाटन समारंभात उद्घाटक म्हणून बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांनी केले. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप (आबा)तुपे होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, दिलीप तुपे, प्रा. डॉ. अरविंद बुरुंगले, चेतन तुपे, अशोक तुपे आदी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3