Pune : न्यायालयातच सचिन अंदुरे याचेही रक्षाबंधन

एमपीसी न्यूज- आज राखी पौर्णिमेचा सण साजरा होत आहे. डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन अंदुरे याला देखील त्याच्या बहिणीने वकिलांच्या मार्फत राखी पाठवण्यात आली होती. कोर्टाच्या परवानगीने न्यायालयातच सचिन अंदुरे याला त्याच्या मेहुणीने राखी बांधली. त्याचबराेबर सीबीअायच्या तपासणीनंतर त्याच्यासाठी कुटुंबियांनी पाठवलेला ड्रेस देखील त्याला देण्यात अाला.

रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अंदुरे याला बेलापुरवरून न्यायालयात हजर करण्यात आले. अंदुरेच्या बहिनीने वकीलांच्या मार्फत अंदुरेला राखी पाठवली हाेती. सुनावणीच्यावेळी त्याच्या काही जवळच्या व्यक्ती न्यायालयात हजर हाेत्या. अंदुरेच्या मेव्हणीने त्याला न्यायालयाची परवानगी घेवून कोर्ट हॉलमध्ये राखी बांधली. त्यावेळी अंदुरे यांने तिच्याकडे कुटुंबियांची चौकशी केली.

डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येप्रकरणी सचिन अंदुरे याला सीबीअायने अाैरंगाबादहून अटक केली हाेती. अंदुरे याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने डाॅ. दाभाेलकरांवर गाेळी चालविली असल्याचा दावा सीबीअायने केला अाहे. अंदुरेला 19 अाॅगस्ट राेजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 7 दिवसांची सीबीअाय काेठडी सुनावली हाेती. अाज अंदुरे याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्याला पुन्हा 30 अाॅगस्टपर्यंत सीबीअाय काेठडी देण्यात अाली अाहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.