Pune : केशरी रेशनकार्डधारकांना 25 एप्रिलपासून सवलतीच्या दरात धान्य मिळणार : मोहन जोशी

एमपीसी न्यूज : सध्याची गरज लक्षात घेऊन केशरी रंगाच्या रेशनकार्डधारकांना 25  एप्रिलपासून सवलतीच्या दरात रेशनच्या दुकानातून धान्य मिळेल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.

राज्य शासनाने एक मे पासून केशरी रंगाच्या रेशनकार्डधारकांना सवलतीच्या दरात रेशन देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, टाळेबंदीला पंचवीस दिवसांहून अधिक काळ झालेला असल्याने केशरी रेशनकार्डधारकांना  रेशनवर लवकरात लवकर आणि स्वस्त धान्य उपलब्ध करुन मिळावे, अशी  मागणी राज्याचे नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती. त्यांनीही तातडीने या मागणीचा विचार केला आणि एक मे ऐवजी 25एप्रिलपासूनच रेशनवर धान्याचे वितरण करण्याला मंजुरी दिली अशी माहिती जोशी यांनी दिली.

केशरी कार्डधारकांना (मे आणि जून महिन्याकरिता) प्रति व्यक्ती आठ रुपये किलो दराने तीन किलो गहू आणि प्रति व्यक्ती बारा रुपये दराने दोन किलो तांदूळ मिळेल, असे जोशी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.