Pune : शरद मोहोळवर गोळ्या झाडणारा साहिल पोळेकर मोहोळसोबत होता फिरत; आरोपींसोबत होते दोन वकील?

एमपीसी न्यूज : शरद मोहोळ खून प्रकरणी अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी (Pune) आज पत्रकार परिषद घेऊन खुनाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले, की मुख्य आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर हा 25 दिवस शरद मोहोळ याच्या सोबतच फिरत होता. आणि काल अचानक शरद मोहोळ घरातून बाहेर पडल्यावर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्याने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. आरोपी मोहोळ सोबत राहून त्यांच्यावर लक्ष ठेवत होता. 

आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर (रा. सुतारदरा) आणि इतर 2 साथीदारांनी गोळ्या घालत मोहोळचा खून केला. घटनेनंतर हे 3 आरोपी घटनास्थळावरून पळून गेले होते. मुख्य आरोपी पोळेकर हा शरद मोहोळ सोबत अनेक दिवसांपासून सोबत फिरत होता. जेणेकरून मोहोळ याला साहीलवर संशय येणार नाही.

आरोपीना शोधण्यासाठी गुन्हे शाखेकडून तपासासाठी 8 पथक तयार करण्यात आली होती. शहरातील सर्व रस्ते बंद करत नाकाबंदी करण्यात आली होती. आरोपी खेड शिवापूर टोलनाक्याजवळ लपून बसले होते. आरोपींच्या गाडीत एकूण 8 जण होते. तर त्यामध्ये दोन वकिलांचा देखील समावेश आहे.

Pune : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सुटकेच्या शताब्दी वर्षानिमित्त बाईक रॅलीचे आयोजन

नामदेव महिपती कानगुडे आणि मारुती विठ्ठल गांदले या दोघांचे शरद मोहोळ याच्यासोबत वाद होते. नामदेव कानगुडे हा मुख्य आरोपी पोळेकर याचा मामा असल्याचे समोर आले आहे. या जुन्या वादामुळेच हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आरोपींकडून मिळाली आहे.

या खुनात एकूण 8 आरोपी सामील असून त्यातील दोन वकील असल्याचेही समोर आले आहे. या (Pune) वकिलांचा गुन्ह्यांमध्ये नेमका रोल काय? याचा तपास आम्ही सुरू करत आहोत असे रामनाथ पोकळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.