Pune : संत सावतामाळी महाराज पुण्यतिथी घरातच साजरी करावी -विशाल महाराज गडगे 

Saint Savata mali Maharaj's death anniversary should be celebrate at home - Vishal Maharaj Gadge

एमपीसी न्यूज – संत शिरोमणी सावता महाराज यांचा 725 वा संजीवन समाधी सोहळा येत्या 19 जुलैला साजरा करण्यात येत आहे. मात्र, कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे व पिंपरी चिंचवड शहरात दहा दिवसांसाठी लॅाकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाची संत सावतामाळी महाराज यांची पुण्यतिथी घरातच साजरी करावी असे आवाहन संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष हभप. विशाल महाराज गडगे यांनी केले आहे.

संत शिरोमणी सावता महाराज यांचा 725 वा संजीवन समाधी सोहळा येत्या 19 जुलैला साजरा होणार आहे. दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात अखंड हरिनाम सप्ताह, किर्तने, प्रवचने,अन्नदान महाआरती यांचे भव्य आयोजन करुन साजरा करण्यात येत असतो. परंतु, यावर्षी संपूर्ण जगात कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. या महामारीच्या प्रतिबंधासाठी  शासन  विविध उपाययोजना करत आहे.

भाविकांनी समाजभान जपत यंदा संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी घरातच प्रतिमापूजन व  दिपप्रज्वलन करुन साजरी करावी. तसेच या संकटाच्या काळात  स्वतःची व  कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन  हभप. विशाल महाराज गडगे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.