Pune : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर चालण्यास भिडेगुरूजी, शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना मनाई

एमपीसी न्यूज- संभाजी भिडे आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर चालण्याची परवानगी पुणे पोलिसांनी नाकारली आहे. या पालखी सोहळा समितीतर्फे याबाबत पुणे पोलिसांना पत्र देण्यात आले आहे. पालखी सोहळ्यात कुणीही घुसू नये अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

परंपरागत पद्धतीने चालत आलेला दिंड्यांचा क्रम कायम राहावा असे मत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुखांनी मांडले. त्यानंतर पोलिसांनी भिडे गुरुजी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पालखी सोहळ्याच्या पुढे चालता येणार नाही हे स्पष्ट केले. पालखीच्या पाठीमागून संभाजी भिडे किंवा शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते चालू शकतात असेही पोलिसांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.