Pune : संभाजी भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे यांना पुणे जिल्हा बंदी

एमपीसी न्यूज-  कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या दिवाशी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदु एकता आघाडीचे मिलीद एकबोटे यांना पुणे जिल्हा बंदी करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि. 22) जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाच्या तयारीच्या निमित्ताने आढावा घेण्यात आला त्यावेळी संदीप पाटील यांनी ही माहिती दिली. एक जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आदेश दिले आहेत. मिलिंद एकबोटे आणि भिडे गुरुजी यांच्यासह एकूण 163 आरोपींना जिल्हाबंदी. करण्यात आलेली आहे. 2018 मध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्या सर्वांचा यामध्ये समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.