Pune : ‘समृद्ध मातृभूमी ‘ मासिकाचे डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हस्ते प्रकाशन

माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांचा उपक्रम

एमपीसी न्यूज- ‘समृद्ध मातृभूमी ‘ मासिकाचे प्रकाशन विश्वशांती केंद्राचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांच्या जन्मदिनी करण्यात आले.

या प्रसंगी ए. डी. टी. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील रॉय, विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, बिहार राज्याचे पर्यटनमंत्री प्रमोदकुमार, प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, डॉ. असछ जामकर, डॉ सर्फराज पठाण, सौ. जन्नत पठाण इ. उपस्थित होते.

‘मासिकाचा दर्जा पहाता हे मासिक प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात, ग्रामपंचायत आणि स्वयंसेवी संस्था यांच्यासाठी ज्ञानाचा अनमोल खजिनाच ठरणार आहे ‘, असे उद्गार प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी प्रकाशन समारंभ प्रसंगी काढले.

प्रा. डॉ. एस. एन. पठाण हे या मासिकाचे प्रमुख मानद संपादक असून सहसंपादक श्री. संदीप तापकीर हे आहेत, प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला समृध्द मातृभूमीचा अंक प्रकाशित होणार आहे.

‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांनी पर्यावरण संरक्षण, ग्रामीण विकास व सांप्रदायिक सद्भाव या देशातील विषयांना वाहिलेले ‘समृद्ध मातृभूमी ‘हे मासिक सुरू करून एक प्रकारे देशसेवेचे कंकणच हाती बांधले आहे ,असे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुभेच्छा संदेशाद्वारे केले. या अंकाच्या प्रकाशनासाठी पाठविलेल्या संदेशात हे मत नोंदविले आहे. ‘एका माजी कुलगुरुंनी मासिक सुरू करण्याचा घेतलेला निर्णय हाच मुळात देशसेवेसाठी महत्वपूर्ण आहे ‘, याबद्दल त्यांनी डॉ. पठाण यांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.