Pune : छावा स्वराज्य सेनेतर्फे पोलीसांसाठी सॅनिटायजरचे वाटप

0

एमपीसी न्यूज – छावा स्वराज्य सेनेतर्फे पोलीसांसाठी सॅनिटायजरचे वाटप करण्यात आले. तसेच पुणे शहरातील विविध पोलीस चौकीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.

छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक राम घायतिडक यांच्या हस्ते शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथील विशेष सुरक्षा विभाग (SPU) मधील पोलीस कर्मचाऱ्यांना सॅनिटायजरचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी पोलीस कर्मचारी अंमलदार इम्तियाज मोनिन तसेच पोलीस कर्मचारी नवनाथ जाधव, विजय लोहकरे, विलास धोंडे आणि सामाजिक कार्यकर्ते कौशल गुपचूप व सिद्धार्थ माळवे उपस्थित होते.

छावा स्वराज्य सेनेतर्फे शास्त्रीनगर पोलीस स्टेशन, वारजे पोलीस स्टेशन, माळवाडी पोलीस चौकी, रामनगर पोलीस चौकी, अलंकार पोलीस स्टेशन, अलंकार पोलीस चौकी, तसेच अलंकार पोलीस स्टेशनवरून परप्रांतीयांना पुणे रेल्वे स्थानकावर घेऊन जाणाऱ्या बसेस देखील सॅनिटाईज करण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like