Pune: लोकजनशक्ती पार्टीच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी संजय चव्हाण

Pune: Sanjay Chavan Lok Janshakti Party's Pune District Vice President चीन सीमेवर हुतात्मा झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली.

एमपीसी न्यूज- केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी संजय दामोदर चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे पुणे शहर जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट यांनी चव्हाण यांना नियुक्तीचे पत्र दिले.

पक्षाच्या पुणे शहर कार्यालयात झालेल्या या नियुक्ती कार्यक्रम प्रसंगी प्रदेश सरचिटणीस अशोक कांबळे, प्रवक्ते के.सी.पवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आगामी काळात पुणे जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांची यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच चीन सीमेवर हुतात्मा झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.