Pune : मनसेच्या उमेदवारांचे डिपॉझिटदेखील वाचणार नाही- खासदार संजय काकडे

एमपीसी न्यूज – मनसे उमेदवार किशोर शिंदे यांना काँगेस – राष्ट्रवादीने पाठिंबा दिला असला तरी, मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांचे डिपॉझिट देखील वाचणार नाही, असे भाकीत राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी एमपीसी न्यूजचा प्रतिनिधीशी बोलताना केले.

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चांगले काम सुरू आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे 1 लाख 15 हजार मतांनी विजयी होणार, असा विश्वासही काकडे यांनी व्यक्त केला.

कोथरूड मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्जाची आज सकाळी 11 पासून छाननी सुरू असून यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मनसेचे उमेदवार किशोर शिंदे एकमेकांच्या शेजारीच बसले होते. यावेळी खासदार संजय काकडे उपस्थित होते. भाजप, मनसे व इतर पक्ष, अपक्ष उमेदवारांचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील यांच्या अर्जावर आक्षेप 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर एका उमेदवाराने आक्षेप घेतला. नागपूर विधानभवनात राहण्याचा खर्च दिला नसल्याचे संबंधित उमेदवारांचे म्हणणे होते. यावर चंद्रकांत पाटील यांनी व्यवस्थित खुलासा केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे समाधान झाले, अशी माहिती खासदार गिरीश बापट यांनी दिली. दरम्यान, कोथरूड मतदारसंघात पाटील यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. पाटील यांना ही निवडणूक वाटते, तशी सोपी राहिलेली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.