Pune : संजय राऊत सच्चा शिवसैनिक – विजय शिवतरे

एमपीसी न्यूज : ठाकरे गटाचे नेते राज्यसभा (Pune) खासदार संजय राऊत यांना हिंदू विरोधी, मार डालूंगा, तुझे दिल्ली में मिल, एके 47 से उडा दूंगा मूसेवाला टाईप, लॉरेन्स की ओरसे ये मेसेज है समझ ले असा धमकीचा मेसेज संजय राऊत यांना केल्याची घटना घडली आहे. 

त्याबाबत शिंदे गटातील शिवसेनेचे नेते माजी मंत्री विजय शिवतरे म्हणाले की, संजय राऊत आणि मी जवळपास सात वर्ष प्रवक्ते म्हणून काम केले आहे. आम्ही दोघांनी शिवसेनेची बाजू मांडण्याच काम केले आहे.

संजय राऊतांसारखा माणूस अशा धमक्यांना भीक घालणारा नाही. ते सच्चा शिवसैनिक असून बिष्णोई किंवा कोणीही असू त्याचा त्यांना काही फरक पडत नाही. राज्याच्या दृष्टीने (Pune) संजय राऊत हे महत्त्वाचे नेते असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या संरक्षणाची काळजी घेण्यास सक्षम नेते आहेत.

Pimpri Chinchwad Police Recruitment : मागील भरतीत कॉपी प्रकरणात 50 उमेदवार झाले होते बाद

तसेच, केवळ चर्चेत राहण्यासाठी देखील असे केले असल्याची शक्यता विजय शिवतरे यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.