Pune : संजय राऊत यांची उद्या पुण्यात प्रथमच जाहीर सभा

एमपीसी न्यूज – शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यावर पुण्यात (Pune) प्रथमच शिवसेना नेते संजय राऊत यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत राऊत कोणाकोणाचा समाचार घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

महात्मा फुले मैदान, कार्टन गेट, नाना पेठ येथे उद्या सायंकाळी 5 वा. ही सभा होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे सध्या अधिवेशन सुरू आहे.

Bhosari : दुकानांवर दोन दिवसात मराठी पाट्या लावा अन्यथा, मनसेचा इशारा

त्यावर संजय राऊत काय बोलणार याची उत्सुकता आहे. सुमारे 5 हजार लोक या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख (उध्दव ठाकरे गट) संजय मोरे यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा महत्वपूर्ण मानली (Pune) जात आहे. नुकत्याच झालेल्या 5 राज्यांपैकी 3 राज्यांत भाजपची सत्ता आली आहे. काँग्रेसने या राज्यांत विरोधी पक्षांना विश्वासात घेतले नाही. त्यावर राऊत काय भाष्य करणार याकडे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.