BNR-HDR-TOP-Mobile

Pune : संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे आयोजित आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात

एमपीसी न्यूज – संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेले आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. यामध्ये मधुमेह आणि रक्त-शर्करा तपासणी करण्यात आली. हे शिबिर संत निरंकारी सत्संग भवन गंगाधाम येथे झाले. शिबिरात 400 पेक्षा अधिक नागरिकांनी तपासणी केली.

मधुमेह मुक्त भारत अभियानांतर्गत हे शिबिर आयोजित करण्यात आले. डॉ. प्रकाश धायरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिबिराचा उद्देश सांगत त्यांनी मधुमेहाच्या आजाराबाबत असलेले समज-गैरसमज याबद्दल माहिती दिली. मधुमेह पूर्णतः बरा करण्यासाठी योग्य उपचार, योग्य जीवनशैली, व्यायाम याचे महत्व देखील त्यांनी सांगितले.

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. रवींद्र नांदेडकर यांच्या 23 वर्षांच्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे कि मधुमेह संपूर्ण बरा होऊ शकतो. या अभियानांतर्गत संपूर्ण भारत देश मधुमेह मुक्त करण्यासाठी 18 वर्षाखालील बालकांना मोफत औषध उपचार दिला जातो. तसेच पूर्व- मधुमेह रुग्णांना शोधून त्यांना मार्गदर्शन केले जाते. मधुमेह असलेल्या रुग्णांना संपूर्ण मधुमेह मुक्त राहण्यासाठी उपचार सांगितला जातो.

 

सेवादल चॅरिटेबलच्या स्वयंसेवकांनी या शिबिराचे आयोजन केले. संत निरंकारी मंडळाचे पुणे झोनचे प्रभारी ताराचंद करमचंदानी यांनी आभार मानले.

.