Pune : लीला फिरोज पूनावाला यांना सरपंच परिषदेचा समाजसेवा पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी काम करून अनेक मुलींचे जीवन ( Pune) प्रकाशमान करणाऱ्या  लीला फिरोज पूनावाला यांना समाजसेवा पुरस्कार जाहीर झाला आहे. सक्षम ग्रामपंचायत, सन्मानित सरपंच आणि गावगाड्याच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या वतीने, येत्या 3 डिसेंबर 2023 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, यशदा पुणे येथे हा पुरस्कार दिला जाणार आहे.

 Pune : किर्तन महोत्सवात रंगला कीर्तन संवाद

सरपंच परिषदेच्या वतीने उत्कृष्ट काम करणारे समाजसेवक, सरपंच, ग्रामसेवक, अधिकारी, व लोकप्रतिनिधींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. शैक्षणिक क्षेत्रात योगदान असलेल्या लीला पूनावाला फौंडेशनचे समाजातील गरीब गरजू मुलींसाठी अतिशय अभिमानास्पद काम सुरु आहे.

फौंडेशनने आजपर्यंत जवळजवळ 20,000 मुलींना स्कॉलरशिप देऊन त्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत केली आहे.  पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र राज्यात काम करत आहे. लीला पूनावाला फौंडेशन मुलींच्या उच्च शिक्षणासाठी करत असलेले उत्कृष्ट काम लक्षात घेता सरपंच परिषदेच्या राज्य कार्यकारणीने समाजसेवा पुरस्कारासाठी लीला फिरोज पूनावाला यांची ( Pune) निवड केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.