Pune: वंशाला दिवा पाहिजे म्हणून सरपंच महिलेचा छळ, सासू-सासऱ्यांसह पतीवर गुन्हा दाखल

Pune: Sarpanch woman harassed for wanting son for family, case filed against husband along with in-laws पीडित महिला या सरपंच आहेत. त्यांना एक 17 वर्षांची मुलगी असून आणि 13 वर्षांचा मुलगा होता. काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला.

एमपीसी न्यूज- वंशाला दिवा पाहिजे असा अट्टहास करत सरपंच महिलेचा छळ करणाऱ्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेची नसबंदी शस्त्रक्रिया झाली होती. तरी सुद्धा मुलगा व्हावा यासाठी तिच्यावर दबाव टाकत आरोपींनी तिला मारहाणही केली. भोर तालुक्यातील एका गावात हा प्रकार घडला. पीडित महिलेच्या फिर्यादीनंतर आरोपींविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित महिला या सरपंच आहेत. त्यांना एक 17 वर्षांची मुलगी असून आणि 13 वर्षांचा मुलगा होता. काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला.

त्यानंतर वंशाला दिवा पाहिजे म्हणून पीडित महिलेचे सासू-सासरे पती नणंद यांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच तिची नसबंदी शस्त्रक्रिया झाली असल्याने ती खोलण्यासाठी तिच्यावर वारंवार दबावही आणला.

अखेर हा त्रास असह्य झाल्याने पीडित महिलेने या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार खोमणे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.