Pune : ‘ससून हॉस्पिटल’कडून सहकार्य होत नाही -आयुक्त शेखर गायकवाड

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’ला आटोक्यात आणण्यासाठी आम्ही अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. ससून हॉस्पिटलकडून 10 दिवसांपूर्वीच सहकार्य अपेक्षित होते. ते होत नसल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले. ससून हॉस्पिटलला महापालिकेने सर्व परवानगी दिल्या आहेत. आज परत महत्वपूर्ण बैठक होणार आहे.

याबाबत आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले कि, डॉ नायडू रुग्णालयात 100 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत असून रुग्ण ठेवण्याची तेथील क्षमता संपली आहे. त्यामुळे नव्याने बाधा होणाऱ्या रुग्णांना बोपोडी येथील महापालिकेच्या रुग्णालयात ठेवण्यात येत आहे.

बोपोडी येथील रुग्णालय हाऊसफुल झाल्यानंतर सिंहगड रस्त्यावरील लायगुडे रुग्णालयात तर चौथ्या टप्प्यात लवळे येथील सिम्बॉयोसिस महाविद्यालयात तयार करण्यात आलेल्या रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.

नागरीकांनी घाबरून जाऊ नये, महापालिकेने 25 हजार रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था केली आहे. कोणत्याही रुग्णाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेण्यात आल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.