Pune : ससून रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे ‘कोरोना’ वाढतोय, प्रमुखांवर कारवाई करा -अरविंद शिंदे

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन

एमपीसी न्यूज – ससून रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे ‘कोरोना’चा संसर्ग वाढत असल्याने प्रमुखांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँगेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केली आहे. यासंबंधीचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे.

पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक 17 मृत्यू ससून रुग्णालयात झाले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याबाबत राज्य शासन, आरोग्य विभागाने गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. मात्र, या रुग्णालयाकडून त्याप्रमाणे कार्यवाही न होता गेल्या 3 दिवसांत कोरोनाचे मृतदेह अत्यंत निष्काळजीपणे नातेवाईकांच्या ताब्यात देऊन राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केलेले आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयात 113 हून अधिक कोरोनाचे रुग्ण असताना अनेक रुग्ण बरे होत आहेत. मात्र, ससून रुग्णालयात बरे होण्याचे प्रमाण कमी आहे. या रुग्णालयातील हलगर्जीपणामुळे रिकव्हरी न होणे कोरोना वाढण्याचे प्रकार वाढत आहेत.

शासनाच्या गाईडलाईन्स प्रमाणे काम होत नसल्याने ससूनचे प्रमुख यांची बदली करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच जबाबदार अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करावे, असेही अरविंद शिंदे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.