Pune : सतीश खाडे यांना ‘पर्यावरण रक्षक पुरस्कार’ प्रदान

एमपीसी न्यूज- तरुण भारत संघ, अलवर, राजस्थानच्या “पर्यावरण रक्षक पुरस्कार 2019 ” ने भारतातील सतरा राज्यातील पाणी आणि पर्यावरण कार्यकर्त्यांना गौरविण्यात आले. यामध्ये रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट 3131 च्या वॉटर कमिटीचे अध्यक्ष सतीश खाडे यांना जलसंवर्धन क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरविण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी महात्मा गांधींचे नातू अरुण गांधी, पणतु तुषार गांधी यांच्या हस्ते राजस्थान उच्च न्यायालय न्यायाधीशांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.
हकिमपुरा, अलवर, राजस्थान येथे हे पुरस्कार 15 जानेवारी रोजी देण्यात आले. तरुण भारत संघाचे अध्यक्ष भारताचे जलपुरुष राजेंद्रसिंहजी असून पुरस्काराचे हे तेरावे वर्ष आहे.

किशोर धारीया, रवींद्र इंगवले (,वाशीम), प्रकाश राव (जलसंधारण मंत्री, तेलंगणा ), भक्तचरण ( खासदार व माजी केंद्रीय मंत्री ओरिसा) ,खासदार एम बी पाटील, (विजापूर कर्नाटक),,बिहार विधानसभा अध्यक्ष श्री सहाय, आमदार किशोर उपाध्याय, शेखर गायकवाड (साखर आयुक्त,पुणे ) , डोंगरे, (जिल्हाधीकारी नांदेड ) शंभूनाथ (न्यायाधीश,उच्च न्यायालय,उत्तर प्रदेश ),जिल्हाधिकारी पाॅंडेचरी, प्राध्यापक सौ स्नेहल दोंदे, मुंबई ,जयंत बसु (पत्रकार प. बंगाल ) यांनाही गौरविण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1