Pune : मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते शनिवारी सात प्रकल्पाचे होणार उदघाटन – महापौर मुक्ता टिळक

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील विविध भागात सत्ताधारी भाजपकडून स्मार्ट सिटीअंतर्गत सात प्रकल्पाच्या कामाचे उदघाटन आणि पीएमपीएमएलच्या ताफ्यात 25 इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा येत्या शनिवारी 9 तारखेला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी महापौर मुक्ता टिळक म्हणाले की, स्मार्ट सिटीच्या अंतर्गत स्मार्ट इलेक्ट्रिक बस, स्मार्ट सिटी आॅपरेशन्स सेंटर, आॅफीस राइड, बाणेर येथील स्मार्ट रस्ते पुनर्रचना, प्लेसमेकिंग साइट, स्मार्ट स्कूल्स आणि सायन्स पार्क अशा तब्बल सात प्रकल्पाचे उदघाटन केले जाणार आहे. तर त्यामध्ये प्रामुख्याने शहरामध्ये स्मार्ट सिटीअतंर्गत टप्प्या-टप्प्याने 500 इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात 150 इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात येणार असून त्यातील पाहिल्या 25 बसचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

तसेच त्या पुढे म्हणाल्या, भाजप सरकारकडून मागील साडेचार वर्षाच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारमार्फत अनेक विकास कामे झाली आहेत. तर आता महापालिकेत भाजपची सत्ता येऊन दोन वर्षाचा कालावधी झाला. त्या दरम्यान स्मार्ट सिटी अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे करण्यात आली आहे. त्या माध्यमातून शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.