Pune : काव्य, नृत्य, एकपात्री प्रयोग यांमधून उलगडले स्वातंत्र्यवीर सावरकर

एमपीसी न्यूज – प्रसिद्ध व्याख्यात्या धनश्री लेले यांनी (Pune) सादर केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कविता…, ‘त्या तिघी’ या कादंबरीवर आधारित एकपात्री नाट्यप्रवेश, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विविध स्थळांवर लिहिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कवितांचे नृत्यमय सादरीकरण असलेला ‘सागरा प्राण तळमळला’ हा कार्यक्रम, युवा लेखक व व्याख्याते पार्थ बावस्कर यांचा ‘सावरकरांची लंडन वारी’ हा भारावून टाकणारा कार्यक्रम आणि ‘स्वातंत्र्यवीरा तुझी आरती’ हा सांगीतिक कार्यक्रम यांमधून सावरकरांचे चरित्र उपस्थितांसमोर उलगडले. निमित्त होते पंडित फार्म्स येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘तू सूर्याचे तेज’ या विशेष कार्यक्रमाचे.

पुण्यातील कोटीभास्कर गृपचे चिदंबर कोटीभास्कर यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर अजय धोंगडे हे या कार्यक्रमाचे संयोजक होते. सुप्रसिद्ध निवेदक मिलिंद कुलकर्णी यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पुण्याचे पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. श्रीपाद खुर्जेकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सत्यकी सावरकर, ज्येष्ठ भरतनाट्यम गुरु सुचेता भिडे चापेकर, जनकल्याण समितीचे प्रांत कार्यकारिणी सदस्य विनायक डंबिर, प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं आनंद भाटे, कवी वैभव जोशी आणि निस्सीम सावरकर प्रेमी जयराम नारगोलकर आदी उपस्थित होते.

Pune : ब्रह्मनाद कला मंडळ आयोजित 22व्या ब्रह्मनाद संगीत महोत्सवाचा समारोप

‘स्वातंत्र्यवीरा तुझी आरती’ या सांगीतिक कार्यक्रमाने ‘तू सूर्याचे तेज’ या उपक्रमाचा समारोप झाला. सावरकरांच्या कविता, गाणी आणि अभ्यासपूर्ण निवेदन (Pune) यातून यावेळी सावरकरांचे चरित्र उलगडले गेले. या कार्यक्रमाची संकल्पना ही अनघा मोडक यांची होती यावेळी धनंजय म्हसकर, शरयू दाते, नचिकेत देसाई, केतकी भावे जोशी यांनी गायन केले. कार्यक्रमाचे संयोजन व संवादिनी यांची जबाबदारी निरंजन लेले यांची पार पाडली. तर प्रशांत लळीत (संगीत संयोजन व कि बोर्ड), ओंकार देवसकर (कि बोर्ड), निषाद करलगिकर (तबला), हनुमंत रावडे (पखावज, ढोलक), दिगंबर मानकर (तालवाद्य, ऑक्टोपॅड) यांनी साथसंगत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.