Pune : राज्यस्तरीय गोळाफेक स्पर्धेत सावरी शिंदे हिला रौप्यपदक

एमपीसी न्यूज – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांच्या वतीने घेण्यात आलेल्या 19 वर्षाखालील मुलींसाठीच्या राज्यस्तरीय गोळाफेक स्पर्धेत सूर्यदत्ता पब्लिक स्कूलच्या सावरी सूर्यकांत शिंदे हिने रौप्यपदक जिंकले. राष्ट्रीय स्पर्धेत सावरी शिंदे आता राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.

सावरी शिंदे हिने 13.12 मीटरचा पल्ला गाठून तिने द्वितीय येत हे यश संपादन केले. सावरी शिंदे सूर्यदत्ता पब्लिक स्कुलमध्ये इयत्ता बारावीत (शास्त्र) शिकत आहे.

सावरीच्या यशाबद्दल सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया आणि उपाध्यक्ष सुषमा चोरडिया यांनी प्रमाणपत्र, सुवर्णपदक घालून तिचे अभिनंदन केले. तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.