Pune : सविता शेटीया यांना “प्रियदर्शनी इंदिरा पुरस्कार” देऊन गौरव

एमपीसी न्यूज- पुणे शहर काँग्रेस जेष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधीं यांच्या जयंतीनिमित्त सविता मदनलाल शेटीया यांना त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी प्रियदर्शनी इंदिरा पुरस्कार” देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. माजी आमदार मोहन जोशी आणि आणि अभय छाजेड यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान देण्यात आला. याच वेळी आधार अंकाचे प्रकाशन करण्यात आले .

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आदी उपस्थित होते .

यावेळी बोलताना श्रीपाल सबनीस म्हणाले, “काँग्रेसची संस्कृती एकमेकांना मदत करणे ही आहे आणि पुणे शहर ही संस्कृती पुढे नेत आहे. पुणे शहर काँग्रेस जेष्ठ नागरिक संघ करत असलेले हे कार्य मोठे आहे. ही जेष्ठ मंडळी समाजातील ज्येष्ठ नागरिकांना या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे”.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्वान महिलांचा दरवर्षी “प्रियदर्शनी इंदिरा पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात येतो. यावर्षीचा हा पुरस्कार सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

<