Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठसमोरील उड्डाणपूल पाडणार; दुमजली उड्डाणपूल उभारणार

एमपीसी न्यूज – शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोच्या कामासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठसमोरील उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे. त्या ठिकाणी दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यासंबंधीचे सादरीकरण ‘पीएमआरडीऐ’ नुकतेच करण्यात आले. महापौर, महापालिका आयुक्त, पीएमआरडीऐचे आयुक्त, विविध राजकीय पक्षाच्या गटनेत्यांशी यावेळी चर्चा करण्यात आली.

पीएमआरडीऐतर्फे शिवजीनागर – हिंजवडी मेट्रोचे काम करण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल मेट्रोच्या कामात अडचणींचा ठरत होता. या भागात दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार असल्याने वाहतुकीची समस्या सुटणार असल्याचे सांगण्यात आले.

महमेट्रोतर्फे वणाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट आशा 2 मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. पुणे आणि पिंपरी शहरातून 3 मेट्रो मार्ग जाणार आहे. त्यामुळे वाहतूककोंडी कमी होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लोकडाऊन जाहीर केला आहे. त्यांनतर या कामांना गती येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल परिसरातून औंध, बाणेर, पाषाण, शिवजीनागर, सेनापती बापट मार्गावर जाता येते. या ठिकाणी रोज सकाळी आणि संध्याकाळी वाहतूककोंडी होते. सध्या लोकडाऊनमुळे या भागात शांतता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.