PHD entrance : पीएच.डी प्रवेशासाठी 30 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

एमपीसी न्यूज : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची यंदाच्या शैक्षणिक वर्षाची पीएच.डी प्रवेश परीक्षा 6 नोव्हेंबर रोजी होणार असून यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे (PHD entrance) आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून करण्यात आली आहे.

पीएच.डी साठी किती जागा विभागनिहाय उपलब्ध आहेत याची माहिती विद्यापीठाने परिपत्रक क्रमांक 266 मध्ये जाहीर केले आहे. हे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेस्थळावर उपलब्ध आहे.(PHD entrance) यासाठी एकूण 3 हजार 187 जागा उपलब्ध आहेत.

Kashinath Nakhate : कर्मवीरांची कमवा व शिका योजना पथदर्शी – काशिनाथ नखाते

या जागांसाठी सुरुवातीला उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची 100 गुणांची परीक्षा घेण्यात येईल, त्यांनतर मुलाखत होऊन त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल. एम. फिल, नेट, पेट 2021 परीक्षा उत्तीर्ण उमेवारांना ही परीक्षा न देण्याची सवलत देण्यात आली आहे.(PHD entrance) दरम्यान याविषयीची सविस्तर माहिती http://bcud.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.