Pune University : अथर्वशीर्ष पठणाचा अभ्यासक्रमात समावेश, पुणे विद्यापीठाचा निर्णय

एमपीसी न्यूज : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत-प्राकृत विभागाकडून समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. त्यासाठी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी महाविद्यालयाची मदत घेण्यात आली आहे. (Pune University) संस्कृत विषयाची गोडी वाढावी यासाठी हे पाऊल उचलल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे. अथर्वशीर्षाचा हा कोर्स ऑनलाईन पद्धतीचा असुन तो मोफत उपलब्ध करण्यात आला आहे.

या कोर्ससाठी अथर्वशीर्षाचे काही व्हिडीओ वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर हा अभ्यासक्र करणाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने काही प्रश्नही विचारण्यात येणार आहेत. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना एक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम 21 तासांचा असणार आहे.

Pune News : नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यानच्या अपघातांची कारणे शोधा व आवश्यक उपाययोजना करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

अथर्वशीर्ष हे गणपतीचं सर्वाधिक लोकप्रिय गणपती स्तोस्त्र आहे.(Pune News) महाराष्ट्रात घरोघरी गणपती अथर्वशीर्ष पठण केलं जातं. अथर्वशीर्षामध्ये निर्गुण गणेशाच्या रुपाचं वर्णन करण्यात आलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.