Pune : दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; 3 मार्चपासून दहावी तर, 18 फेब्रुवारीला बारावीची परीक्षा

एमपीसी न्यूज – माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांचे (बारावी) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावीची परीक्षा 3 मार्च 2020 तर बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी 2020 पासून सुरु होणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

दहावीची लेखी परीक्षा 3 मार्च 2020 ते 23 मार्च 2020 या कालावधीत होणार आहे. बारावी व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम परीक्षा 18 फेब्रुवारी 2020 ते 18 मार्च 2020 या कालावधीत होणार आहेत. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

दरम्यान, परीक्षांच्या तारखांबाबत सोशल माध्यमांवरून येणा-या चुकीच्या मेसेजवर विश्वास न ठेवता शाळांमध्ये जाऊन वेळापत्रकाबाबत खात्री करून घ्यावी, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.