Pune – स्कूलबस पलटी ; जिवीत हानी नाही

एमपीसी न्यूज – ब्रेकफेल झाल्याने पलटी झालेल्या स्कूलबसच्या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. परंतु या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

_MPC_DIR_MPU_II

ही घटना आज बुधवारी (दि.9) दूपारी पावणे एकच्या सुमारास कात्रज देहुरोड बाह्यवळण महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रोडवर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दूपारी आंबेगाव बुद्रुक परिसरात असणा-या पोतदार इंटरनॅशनल स्कूलची बस तिसरी आणि चौथीतील 15 विद्यार्थ्यांना घेऊन कात्रजहून न-हेच्या दिशेने निघाली होती. दरम्यान पोतदार शाळेसमोरील सर्व्हिस रस्त्यावर बस वळल्यानंतर बसचा ब्रेक फेल झाल्याने बस पलटी झाली. या अपघातात 3 ते 4 विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नाही . या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.