Pune: शाळांनी शुल्क सक्ती करू नये, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शाळांना पत्र

Pune: Schools should not force fees, NCP Youth Congress letter to schools

एमपीसी न्यूज- कोरोना संकटात शाळांनी शुल्क सक्ती करू नये, अशा मागणीचे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसने कोथरूडमधील शाळांना दिले आहे.

काही पालकांनी शाळेची फी भरण्याबाबत होत असलेल्या सक्तीची व्यथा मांडली असता राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शाळांना फी सक्ती थांबण्याबाबत पत्र दिले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर सरचिटणीस गिरीश गुरनानी यांनी याबाबत माहिती दिली.

लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबाना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बरेच पालक शैक्षणिक शुल्क भरण्यास असमर्थ आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी फी सक्ती करणाऱ्या संस्थांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असा, आदेश देऊनही काही संस्था प्रवेश फी तातडीने भरण्याची सक्ती करत आहेत. ही सक्ती त्वरित थांबवावी असे या निवेदनात नमूद केले आहे.

संस्थेने प्रत्यक्ष शाळा सुरु होईल तोपर्यंत शैक्षणिक शुल्क भरण्यास मुभा द्यावी, आत्ताच सक्ती करू नये, असे गिरीश गुरनानी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.