Pune : चांदणी चौकातील झुडपात सापडलेल्या बाळाच्या नातेवाईकांचा शोध; निर्दयी आईला अटक

Search for baby's relatives found in bushes at Chandni Chowk; Cruel mother arrested

एमपीसी न्यूज – चांदणी चौकातील झुडपात आढळलेल्या एका चार महिन्यांच्या बाळाच्या नातेवाईकांचा शोध लागला आहे. कोथरूड पोलिसांनी या बाळाच्या आईला अटक केली आहे. कौटुंबिक वादातून चिमुकलीला झुडपात टाकून दिल्याची कबुली आईने दिली आहे.

गुरुवारी सायंकाळी चांदणी चौकातून कोथरूडकडे येणाऱ्या रस्त्याच्या बाजूच्या झुडपात एका चार महिन्यांच्या बाळाला कोणीतरी सोडून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली.

या बाळाला कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतले आणि रात्री बाळाच्या पालकांवर गुन्हा नोंदवला.

अतिशय गोंडस दिसणाऱ्या चार महिन्यांच्या बाळाच्या पालकांचा कोथरूड पोलिसांनी शोध सुरू केला. दरम्यान, बाळाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. गोंडस बाळाला सोडून गेल्याचे ऐकून नेटकाऱ्यांनी खूप हळहळ व्यक्त केली.

कोथरूड पोलिसांनी तांत्रिक तपासाला सुरुवात केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना बाळाच्या एका नातेवाईकाची ओळख पटली.

पोलिसांनी त्या नातेवाईकाचा शोध घेतला. ही व्यक्ती बाळाचे काका होते. त्यामुळे पोलिसांनी बाळाला त्याच्या काकांच्या ताब्यात दिले.

त्यानंतर पोलिसांनी बाळाच्या वडिलांचा शोध घेतला. वडिलांकडे चौकशी केली असता बाळाची आई कौटुंबिक किरकोळ कारणांवरून रागावून वारंवार घर सोडून जाते.

गुरुवारी देखील ती घर सोडून गेली. जाताजाता तिने पोटच्या गोळ्याला चक्क झुडपात टाकून दिले.

दरम्यान, पोलिसांनी बाळाच्या आईला अटक केली आहे. कोथरूड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.