Pune: दुसरी महापालिका कोथरूड की हडपसर?

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेत 11 गावांचा समावेश झाल्यावर कमालीचा ताण येत आहे. लवकरच आणखी 23 गावांचा समावेश होणार आहे. त्यामुळे पुणे शहरात 2 महापालिकेची गरज असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोथरूडमध्ये एका कार्यक्रमात म्हणाले होते. आता ही दुसरी महापालिका कोथरूड की हडपसर मतदारसंघात असणार याची उत्सुकता लागली आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार 11 गावांचा महापालिकेत समावेश तर झाला खरा, पण विकासकामे काही होत नाही. विविध प्रकारच्या करांत वाढ झाली आहे. त्यामुळे आपली ग्रामपंचायत बरी होती, अशी म्हणण्याची पाळी नागरिकांवर आली आहे. 11 गावांमध्ये महापालिकेचा 1 प्रभाग करून निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये 2 नगरसेवक निवडून आले. मात्र, या गावांचे अंतर कमालीचे मोठे आहे. फुरसुंगी भागात राहणारा नगरसेवक शिवणे – उत्तमनगर, धायरी भागांत कधी पोहोचणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

भाजपचे सरकार जाऊन आता शिवसेना – राष्ट्रवादी – काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आले आहे, त्यामुळे 2 महापालिका होणार का, याकडे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.