Pune : उद्योगविश्व आणि सांस्कृतिक संबंध ‘ विषयावर राष्ट्रीय परिषद

एमपीसी न्यूज- वाय अँड एम अंजुमन खैरुल इस्लाम संस्थेच्या ‘पूना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रुनरशिप ‘ च्या वतीने ‘उद्योगविश्व  आणि पर्यावरणीय, सामाजिक, नैतिक, सांस्कृतिक संबंध ‘ विषयावर दि 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे .

‘पूना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रुनरशिप ‘ चे संचालक डॉ.शकील अहमद यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली. ही परिषद संस्थेच्या पुणे कॅम्प येथील सभागृहात होईल. देशभरातून संशोधक, प्राध्यापक, व्यवस्थापनशास्त्र विद्यार्थी या परिषदेत सहभागी होऊन प्रबंध सादर करणार आहेत. या विषयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.