Pune: ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव लिमये यांचे कोरोनामुळे निधन

Pune: Senior activist Vasantrao Limaye passed away due to corona आमदार मुक्ता टिळक यांचे वडील व ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव लिमये यांचे शुक्रवारी कोरोना संसर्गामुळे निधन झाले. मुक्ता टिळक आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

एमपीसी न्यूज – कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे वडील व ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव लिमये (वय 85) यांचे शुक्रवारी कोरोना संसर्गामुळे निधन झाले. मुक्ता टिळक आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मात्र, ते सर्वजण 14 दिवस ‘होम कोरोंटाईन’ राहणार आहेत. 

 

भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताचा सोहळा असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे वसंतराव लिमये ज्येष्ठ कार्यकर्ते होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

वसंतराव लिमये हे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजनात 50 वर्षांपासून कार्यरत होते. ते भारतीय नौदलाच्या विक्रांत या लढाऊ नौकेवर काही काळ कार्यरत होते. तसेच टेल्को या नामांकित कंपनीतही त्यांनी कार्य केले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. मागील 2 दिवसांपासून  800 च्या वर कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. तब्बल 4 हजारांच्या वर कोरोना चाचण्या करण्यात येत असल्याने रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

कोरोनामुळे मृत्यू कमी झाले आहेत. मात्र, तरीही नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. विशेषतः जेष्ठ नागरिकांनी अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.