Pune : महापालिका काँग्रेस गटनेतेपदी जेष्ठ नगरसेवक आबा बागुल यांची निवड;उद्या स्वीकारणार पदभार

Senior corporator Aba Bagul elected as Municipal Congress group leader; will assume office tomorrow

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या काँग्रेस गटनेतेपदी जेष्ठ नगरसेवक आबा बागुल यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यासंबंधीचे पत्र दिले आहे, अशी माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिली.

मावळते काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी तब्बल 7 वर्षे या पदावर काम केले आहे. या कालावधीत त्यांनी भाजपवर जोरदार दबाव निर्माण केला होता.

सभागृहात अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. तर, बागुल हे सुद्धा तब्बल 30 वर्षांपासून नगरसेवक आहेत. त्यांनी स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्ष नेता, उपमहापौर या पदांवर काम पहिले आहे.

आता दुसऱ्यांदा गटनेता म्हणून हे काम पाहणार आहेत. मंगळवारी सकाळी ते आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी मला गटनेता होण्यासाठी संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आगामी काळात कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

तसेच, 2022 च्या महापालिका निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळवून देणारा असल्याचा विश्वास आबा बागुल यांनी व्यक्त केला. एचसीएमटीआरचा प्रकल्प पूर्ण करण्यावरही भर देणार असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.