Pune : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले यांचे निधन

एमपीसी न्यूज- ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले यांचे रात्री (Pune) निधन झाले. ते 90 वर्षांचे होते.

त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात आणि पुणे विद्यापीठात भौतिकशास्त्राचे अध्यापन केले. मॉस्को विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. संपादन केली.पुणे विद्यापीठातील अध्यापनानंतर ते  1978-1984 आणि 1988 -1989  साली ते पुणे विद्यापीठात कुलगुरूपदी होते. त्याचबरोबर ते काही काळ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे व इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे देखील  कुलगुरू होते.

IPL 2023-पंजाब किंग्जने दिल्ली संघावर मिळविला दणदणीत विजय

राज्य शासनाच्या शिक्षण विभागातर्फे महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे समन्वयक म्हणून पण त्यांनी काम पाहिले.डॉ. ताकवले यांनी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातील कारकिर्दीनंतर माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून दूरशिक्षणाची पद्धत विकसित करण्याचे काम सुरू केले. त्यांनी महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे संचालक म्हणून देखाृील काम केले. महाविद्यालयांचे मूल्यमापन करून श्रेणी देणाऱ्या नॅशनल असेसमेन्ट आणि अ‍ॅक्रेडिटेशन काऊन्सिलचे (नॅक) अध्यक्षपद त्यांनी (Pune) भूषवले .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.