Pune : धनकवडी बालाजीनगर येथे रस्त्यावर उभ्या केलेल्या 7 दुचाकी जळून खाक

एमपीसी न्यूज- रस्त्यावर उभ्या केलेल्या 7 दुचाकींना आग लागून पूर्णपणे जाळून खाक झाल्या. पुण्यात धनकवडी जवळ पुणे सातारा रस्त्यावर बालाजीनगर येथे आज, गुरुवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. थोड्याच वेळात आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या आगीमध्ये सर्व दुचाक्या जळून खाक झाल्या. या दुचाक्या जळाल्या की कुणीतरी मुद्दाम पेटवून दिल्या याचा पोलीस शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.