Pune : आयएएसच्या सात सायकलपटूंनी आठ दिवसात पार केले पुणे ते कन्याकुमारी 1600 किमीचे अंतर!

एमपीसी न्यूज – इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचा (Pune) सात सायकलपटूकडून पुणे ते कन्याकुमारी ही 1600 किलोमीटरची लांब पल्ल्याची सायकल राईड अवघ्या आठ दिवसात यशस्वी रित्या पूर्ण केली. मोहिमेची सुरुवात इंडो ॲथलेटिक्स सोसायटीच्या ऑफिसपासून 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 3 वाजता करण्यात आली.

यामध्ये इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे संस्थापक सदस्य गजानन खैरे, गणेश भुजबळ, अजित पाटील, प्रदीप टाके, संतोष नखाते, गिरीराज उमरीकर, बाळासाहेब तांबे, कैलास तापकीर हेमंत दांगट यांनी निशाण दाखवून सुरुवात केली. यामध्ये सायकलपटूमध्ये युवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली संदीप परदेशी, प्रशांत सगरे, प्रवीण जगदाळे, चैतन्य वंजारे, आनंद गुंजाळ आणि रणजीत सिंग यांनी सहभाग घेतला.

पुण्याहून निघाल्यापासून कागल येथे 265 किलोमीटरचा पहिला टप्पा, कागलपासून बेळगाव मार्गे येल्लापुर येथे पर्यंत 225 किलोमीटरचा दुसरा टप्पा, त्यानंतर गोकर्ण महाबळेश्वर दर्शन घेऊन मुरूडेश्वर येथे 200 किलोमीटरचा तिसरा टप्पा, मुरुडेश्र्वर ते उडपी येथे पर्यंतचा चौथा टप्पा, तेथून कुंनुर पर्यंतचा 175 किलोमीटरचा पाचवा टप्पा, त्यानंतर थालसेरी मार्गे दक्षिण द्वारका म्हणून ओळखले जाणारे गुरुवायुरपर्यंत 180 किलोमीटरचा सहावा टप्पा, सातव्या दिवशी समुद्रकिनारा अनुभव घेत (Pune) आलप्पी येथे 150 किलोमीटर अंतर कापले. त्यानंतर थिरूअनंतपुरम येथे स्वामी पद्मनाभ दर्शन घेऊन कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंद स्मारक पर्यंत शेवटचा टप्पा पार केला.

Pimpri : ‘छत्रपती ते घटनापती’ पदयात्रा संपन्न

मोहीम सुरू झाल्यानंतर पुणे ते कन्याकुमारीपर्यंत इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे अजित पाटील, सातारा येथे मयुर मिसाळ, कराड येथील राहुल चौगुले, कोल्हापूर येथील आनंद लोंढे, राम वाईंगडे, रमेश बसान, सुनील माटे, रघुनाथ पाटील, अशोक गोक्काकर, ज्योतिबा पाटील, गणेश पाटील यांनी निपाणी येथे मंजुनाथ पिसोत्रे आणि सहकारी, बेळगाव येथे रोहन हरगुडे, शेळेकर, राजू नाईक यांनी भेटून स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या.

या मोहिमेसाठी इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे सहकार्य केले. तसेच, गिरीराज उमरीकर, प्रदीप टाके, संतोष नखाते, मारुती विधाते, बाळासाहेब तांबे, हरी प्रिया नटराजन, रमेश माने, अजय दरेकर, अभय खटावकर, अविनाश चौगले यांचे मार्गदर्शन मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.